आमचे यश

 शाळेचे अध्यक्ष श्री. चंद्राम चव्हाण (गुरुजी), सचिव श्री. सुभाष चव्हाण, प्राचार्य श्री. रविंद्र चव्हाण व कमांडंट यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सूचनानुसार सर्व शिक्षक, मार्गदर्शक कर्मचारी कायम विद्यार्थ्यांच्या विकासाचाच विचार करीत असतात व कोणतेही वेळापञक व वेळेचे बंधन न पाळता सतत विद्यार्थीकेंद्रित विचार करून त्यांना विविध क्षेत्रात यश कसे मिळेल, यासाठी अविरत प्रयत्न करीत असतात. त्याची फलश्रुती याप्रमाणे मिळते.
१.      गेली सहा वर्ष दहावीचा शंभर टक्के निकाल. 
२.      गेली चार वर्षे बारावीचा शंभर टक्के निकाल.
३.      आठवी / पाचवी  एन.टी.एस. एन.न.एम.एस. परीक्षेत आजतागायत अनेक मुलांना शिष्यवृत्ती.
४.      टिळक विद्यापीठ, मराठा मंदिर, भारती विद्यापीठ, हिंदी सुबोध या व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये यश.
५.       एस.ओ.एफ. कडून घेण्यात येणाऱ्या विज्ञान, गणित व इंग्रजी विषयाच्या ओलंपियाड परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश.
६.      ज्युडो-कराटे: विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये (मलेशिया, सिंगापूर, नेपाळ, ऑस्ट्रेलिया) निवड व यश.
७.      खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉल, तलवारबाजी, अॅथलेटिक्स व इतर अनेक खेळांमध्ये खेळांमध्ये विभाग, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर निवड व महाराष्ट्र शासनाचे प्रोत्साहनपर अनुदान. 
८.      बारावीनंतर विविध व्यावसायिक शाखांमध्ये मुलांची मेरीटवर निवड.  
९.      बारावीनंतर भारतीय सैन्यात, भारतीय वायू दलात निवड

१०. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेतर्फे सन २०१४ चा सोलापूर शहरातील उपक्रमशील शाळा पुरस्कारप्राप्त.