आधुनिक व स्पर्धेच्या जगात यशस्वी होण्यासाठी इंग्रजी
भाषा ही फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी शालेने इंग्रजी माध्यम स्वीकारले असून
महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याने मंजूर केलेला अभ्यासक्रम हा पाचवी ते बारावी
पर्यंत शिकवला जातो त्या व्यतिरिक्त विविध
स्पर्धा परीक्षा आणि एन.डी.ए.ची तयारीही सुरुवातीपासूनच करून घेतली जाते.विविध खेळाचे मार्गदर्शन व अश्वारोहण, ट्रेकिंग ,रायफल शूटिंग इत्यादी मार्फत त्यांच्यात साहसी व
खिलाडूवृत्तीचे रोपण केले
जाते. भाषण व संभाषण (वक्तृत्व), विविध निबंध स्पर्धा ,प्रश्नमंजुषा ,संगणकशास्त्र, नेतृत्व गुणविकास, गटचर्चा व गटकार्य(सांघिक ) यांच्या विविध स्पर्धा होऊन त्यांच्यातील कौशल्यांना वाव
मिळावा व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा यासाठी वर्षभर
प्रयत्न केले जातात.दर आठवड्याच्या
शनिवारी छंद वर्ग आयोजित करून विद्यार्थ्यांमधील चित्रकला, गीतगायन, संगीत, कथाकथन इत्यादी कलागुणांना वाव मिळावा यासाठी
प्रयत्न करून या सर्वांचे वर्षभर
अवलोकन करून वर्षाच्या अखेरीस सांस्कृतिक व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम व त्या
कलागुणांचे कौतुक करण्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करून शाळेतील जास्तीत
जास्त मुलांना सहभागी करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.