आमच्या भविष्यातील योजना

आमची शाळा सध्या नेहरू नगर येथील श्री. शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात कार्यरत असून लवकरात लवकर नियोजित वास्तूचे बांधकाम पूर्ण करून शाळा तेथे नेण्याचा प्रयत्न आहे.
१.      शाळेतील शिक्षकांचा अनुभव वर्षानुवर्षे वाढत असून त्यांचा पुरेपूर उपयोग प्रत्येक विद्यार्थी सर्व बाजूंने  परिपूर्ण स्पर्धेत यशस्वीपणे टिकून जास्तीत जास्त यश संपादन करण्यासाठी वचनबद्ध.
२.      प्रत्येक विध्यार्थ्यामधील कौशल्ये शोधून त्याप्रमाणे त्याला वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन व शिक्षण-प्रशिक्षण देऊन यशस्वी करण्यासाठी योजना आखणे.
३.      शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला १००% संगणक साक्षर करण्यासाठी विविध कोर्सेसचा अंतर्भाव करणे व विद्यार्थी निहाय संगणक संचांची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न. 
४.      विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा व क्रियाशीलता यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न.
५.      आधुनिक युगाची चाहूल ओळखून प्रत्येक वर्ग हा  इ-क्लास करण्यासाठी प्रयत्नशील.  
६.       एन.डी.., जे.ई.ई., नीट., सी.ई.टी., यांसाठी १००% यश संपादन करण्याच्या दृष्टीने विविध विषयातील प्रावीण्य प्राप्त शिक्षक व मान्यवर यांचे वर्षभर मार्गदर्शन व क्लासेस चालवण्यासाठी वचनबद्ध.
७.      बारावीनंतर एन.डी.., संरक्षण दले, पोलिस व सुरक्षा दले, व इतर सरकारी, सहकारी, खासगी संस्थांमध्ये आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न.



आमची प्रतिज्ञा
आम्ही जय जवान जय किसान शाळेचे
सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
येथे अशी प्रतिज्ञा करतो की,
आम्ही या शाळेचे कर्मचारी असून
या शाळेच्या प्रगतीसाठी व
शाळेचा नावलौकिक होण्यासाठी
सतत कार्यरत राहून प्रयत्न करू.
विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू समजून
त्याची प्रगती, विकास व उत्थान हेच
आमचे ध्येय आहे.
सर्व विद्यार्थी हे या देशाचे भावी नागरिक
व उद्याचा भारत घडविणारे आधारस्तंभ आहेत.
याची पुरेपूर जाणीव ठेवूनच
आमची भविष्यकालीन वाटचाल राहील.
याची आम्ही खात्री देत आहोत.
या विद्यार्थ्यांचे यशापयश हेच आमचे यश आहे.
त्यांचा मानसिक, शारीरिक व बौद्धिक विकास साधून
तो उद्याच्या स्पर्धेत खंबीरपणे उभा राहून
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल.
माजी राष्ट्रपती मा. अब्दुल कलामांच्या स्वप्नातील
आधुनिक, अभिनव भारत घडवेल
हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून

त्याची ध्येयपूर्ती हीच आमची स्वप्नपूर्ती असेल.