प्रवेश पात्रता इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यासाठी
चौथी पास मुलांची
स्कॉलरशिप परीक्षेच्या धर्तीवर प्रवेश परीक्षा(लेखी ) घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या पंचाहत्तर मुलांची मुलाखत घेतली जाते. व यानंतर पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार यादी (मेरिट लिस्ट) तयार केली जाते. पात्र विद्यार्थ्यांना वैद्यकीय चाचणीचे सर्व निकष तपासून अंतिम प्रवेश निश्चित केला जातो.
प्रवेश परीक्षेचे (स्वरूप व निकाल) व वैद्यकीय
चाचणी याबाबत प्रवेश परीक्षा मंडळ व वैद्यकीय अधिकारी
यांचा निर्णय अंतिम राहील.
अ.
प्रवेश परीक्षेचे विषय व गुण
खालीलप्रमाणे असतील.
१.
भाषा व समाजशास्त्र- १०० गुण- वेळ १ तास.
२.
सामान्य विज्ञान व बुद्धिमत्ता- १०० गुण- वेळ १ तास.
३.
गणित- १०० गुण- वेळ १ तास.
प्रवेश मर्यादा ४५ प्रति वर्ग.
ब. विध्यार्थ्याची मुलाखत व त्यांचे शैक्षणिक ज्ञान, सामान्य ज्ञान,जिज्ञासा व आवड जाणून
घेण्याच्या दृष्टीने घेतली जाईल.
क. वैद्यकीय चाचणी:
उंची, छाती,
दृष्टी, श्रवणशक्ती सामान्य असून त्यांच्यात काही व्यंग
नाही व विद्यार्थी शारीरिक दृष्टीने सर्वतोपरी सामान्य असल्याची खात्री करूनच
प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यास काही आजार अथवा व्यंग असल्यास
ते पालकांनी वैद्यकीय अधिकारी व शालेय व्यवस्थापनाकडे नमूद करणे आवश्यक आहे. हे आपल्याच हिताचे आहे.
माध्यम इंग्रजी/ मराठी इतर वर्गासाठी उपलब्धतेनुसार
व पात्रतेनुसार प्रवेश दिला जाईल. कार्यालयात संपर्क साधून त्याबद्दल माहिती घेणे.
११ वी शास्त्र शाखेसाठी उपलब्धतेनुसार प्रवेश दिला जाईल, १० वी चा निकाल लागताच
त्यासंबंधींत जाहिरात दिली जाईल. पालकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा.