शाळेचे नियम व अटी

प्रवेशानंतर जर एखादा विद्यार्थी जर वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असल्यास ज्यामुळे त्याला शस्त्र सेनेमध्ये प्रवेशासाठी अपात्र ठरविले जाण्याची शक्यता आहे. असे दिसून आल्यास अशा विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यास परवानगी देण्यात येईल, मात्र अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या संभाव्य धोक्याची व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी पालकांवर असेल.
सैनिक शाळेत शिकत असताना इतर उपक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्याला काही इजा झाल्यास शालेय प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही. पालकांना अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची भरपाई मागण्याचा हक्क राहणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जरुरी असल्यास वैद्यकीय उपचारासाठी येणारा खर्च पालकांना करावा लागेल. शाळेत एकदा प्रवेश घेतलेले विद्यार्थी शाळेत इयत्ता बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत शाळेतील असे गृहीत धरून प्रवेश दिला जातो. मात्र खालील बाबीत दोषी आढळून आल्यास शाळेतील प्रवेश रद्द होऊ शकतो.
१.      मुलगा शाळेत योग्य ती शैक्षणिक प्रगती दाखवू शकत नाही.  
२.      जर शाळेला चुकीची माहिती देऊन, बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश मिळवला असे निदर्शनास आल्यास.
३.      फीची किंवा अन्य रकमांची बाकी अधिक राहिली असल्यास.
४.      एकाद्या मुलांचे वर्तन, शाळेच्या उद्दिष्टास आणि प्रशासनास हानिकारक असल्यास किंवा पालकांचा असहयोग असल्यास त्या मुला शाळेतून काढून टाकण्याचा अधिकार शाळेच्या प्रशासनास राहील.
५.      विद्यार्थ्याने शालेय परीक्षेत गैरव्यवहार केल्यास.

मुलांकडे कोणत्याही मौल्यवान वस्तू (दागिने इत्यादी) अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तू (मोबाइल इत्यादी) ठेवण्यास सक्त मनाई आहे. तसेच शाळा  व वसतिगृह परिसर परवानगीशिवाय सोडून जाणे शिक्षापात्र ठरेल व त्याची वारंवारिते मुळे प्रवेश रद्द होऊ शकतो.
पालकांकडून शाळेला देय असणारी संपूर्ण थकबाकी रक्कम शाळेत जमा केल्यानंतर किंवा सर्व देय रकमेचा हिशेब समाधानकारकपणे पूर्ण केल्यानंतर शाळा सोडण्याचा वर्तणुकीचा दाखला देण्यात येईल. शालेय वेळेत सामाजिक, धार्मिक व इतर घरगुती कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी मुलास परवानगी देण्यात येणार नाही. सुट्टीनंतर नियोजित तारखेस आवश्यक असलेले शुल्क भरणा करून विद्यार्थ्याला जरूर असणाऱ्या सर्व वस्तूंची पूर्तता करावी लागेल. मुलाला शाळेत दाखल करण्याची संपूर्ण जबाबदारी पालकांची असेल. पालक भेटीच्या व इतर वेळी कोणतेही खाद्यपदार्थ मुलांना देऊ नयेत. पालकभेट वेळे व्यतिरिक्त पालकांना शाळेच्या प्रांगणात प्रवेश दिला जाणार नाही. दिलेल्या वेळेत अशक्य असल्यास आपल्या पाल्यांशी फोनवरून वा पत्रव्यवहारातून संपर्क साधता येईल.

प्रवेश अर्जासोबत पूर्वीच्या शाळेचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला जातीचा, उत्पन्नाचा दाखला योग्य त्या अधिकाऱ्याकडून  साक्षांकित करणे आवश्यक आहे. शाळेत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांनी रुपये १०० च्या मुद्रांक पत्रावर हमीपत्र भरून देणे आवश्यक आहे. संस्थेने व शासनाने वेळोवेळी लागू केलेले नियम पालकांवर बंधनकारक राहतील. जातीचा, उत्पन्नाचा दाखला विहित वेळेत सादर न केल्यास त्या विद्यार्थ्याला संबंधित शासकीय सवलतींचा लाभ घेता येणार नाही व शाळेचे संपूर्ण शुल्क पालकास भरावे लागेल अशा परिस्थितीस शाळा जवाबदार राहणार नाही. पालकांनी नियमितपणे शिक्षक व कार्यालयाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची प्रगती व शिस्त याबद्दल आढावा घ्यावा.