सुविधा

सुविधा:
ही शाळा निवासी असल्याने त्याला दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा शाळेकडूनच पुरविल्या जातात.
१.       ग्रंथालय:
वाचाल तर वाचाल या उक्तीचे महत्त्व जाणून शाळेने सुसज्ज ग्रंथालय उपलब्ध करून दिले आहे. ग्रंथालयात अभ्यासक्रमावर  आधारित, ज्ञानवर्धक, संस्कारक्षम, मनोरंजनात्मक, अध्यात्मिक, तत्त्वज्ञान, स्पर्धा परीक्षा उपयोगी अशा विविधांगी असंख्य पुस्तकांचा समावेश केला आहे. तसेच दैनिक वृत्तपत्रे, मासिके उपलब्ध करून त्यांची बौद्धिक पातळी वाढवून त्यांना चांगले वाचबनवण्याचा प्रयत्न केला जातो. 
२.      संगणक कक्ष:
आधुनिक युग हे संगणक युग आहे, हे ओळखून शाळेने स्वतंत्र संगणक कक्ष (इ-रूम ) स्थापिला आहे. येथे स्वतंत्र संगणक शिक्षकांच्या माध्यमातून संगणक ओळख पासून ते इंटरनेटचा प्रवास होतो. तसेच प्रोजेक्टरच्या माध्यमातून अभ्यासक्रम व ज्ञानवर्धन करणाऱ्या विविध सीडीज  व कार्यक्रम दाखविले जातात. तसेच एन.डी.ए. व स्पर्धात्मक परीक्षेची तयारी या माध्यमातून करून घेतली जाते.
३.      टी.व्ही.:
मुलांच्या ज्ञानात भर पडावी मनोरंजनही व्हावे यासाठी शाळेने स्वतंत्र टी.व्ही. रूम उपलब्ध करून दिली आहे. येथे डिस्कवरी, बातम्या व मर्यादित मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे प्रक्षेपण वर्गवार/ इयत्तावार विध्यार्थ्यांना   दाखविले जातात.  
४.      प्रयोगशाळा:
 पाचवी ते दहावी, अकरावी- बारावी शास्त्र शाखे उपायुक्त अशी सर्व सुविधायुक्त व जीवशास्त्र, रसायनशास्त्रभौतिकशास्त्र या तिन्ही विषयांची स्वतंत्र अशी प्रयोगशाळा शाळेच्या प्रांगणात उभी आहे. शासन नियमाप्रमाणे व विविध प्रयोगास लागणारे साहित्य येथे उपलब्ध असून त्यांची देखभाल व विद्यार्थी प्रशिक्षणासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा कर्मचारी कार्यरत आहेत.
५.      स्नानगृह व प्रसाधनगृह:
सर्व विद्यार्थ्यांसाठी पुरेसे होईल असे स्नानगृह व प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले आहे. 
६.      पाणी:
पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी महापालिकेचे पाणी व इतर वापरासाठी बोअरवेलचे पाणी चोवीस तास उपलब्ध केले आहे. पिण्याचे पाणी आर.ओ. पद्धतीने फिल्टर  मधून शुद्ध करून घेऊनच पिण्यासाठी उपलब्ध केले जाते.
७.      खेळ मैदान :
मुलांना विविध खेळ साहित्य जसे व्हॉलीबॉल, फूटबॉल, हॅण्डबॉल, हॉकी, बास्केटबॉल उपलब्ध करून दिले जाते. तसेच या व इतर खेळांसाठी लागणारी सराव मैदाने बनवून घेतली आहेत. तसेच चारशे मीटरचा  परिपूर्ण रनिंग ट्रेक ही उपलब्ध आहेत. रायफल शूटिंगसाठी एअर गन्स व टार्गेट बोर्ड उपलब्ध आहेत. या सर्व खेळांचे प्रशिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन विविध स्पर्धेत भाग घेतात व वर्षातून एकदा क्रीडा सप्ताहाचे आयोजन करून त्यांचे खेळातील प्राविण्याचे मूल्यमापन केले जाते.
८.      वर्गखोल्या:
प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र सर्व सुविधायुक्त वर्गखोली उपलब्ध असून त्यामध्ये रोजच्या वेळापत्रकाप्रमाणे व स्वयं- अभ्यासासाठीचे नियमित ता चालतात.
९.      भोजन व स्वयंपाकगृह:
 मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहार बनवण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त स्वतंत्र स्वयंपाकगृह असून तो बनविण्यासाठी स्वतंत्र पाक कुशल आचारी व इतर कर्मचारी कार्यरत आहेत. मुलांना भोजन करण्यासाठी स्वतंत्र भोजनकक्ष असून त्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे.
१०. निवास:
मुलांना राहण्यासाठी निवास व्यवस्था (वसतिगृह) करण्यात आली असून तेथे लागणारे साहित्य बंकबेड, गादी, उशी, बेडशीट, प्रकाश व्यवस्था यांची उत्तम सोय केली जाते. त्याची स्वच्छता व सुव्यस्थेसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमलेला आहे. 
११.  सी.सी.टी.व्ही. :
वसतिगृह / भोजनकक्ष व टी.व्ही. कक्षामध्ये सी.सी.टी.व्ही. कार्यरत आहे.